आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:आ. पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

तामलवाडी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे जिल्हा परिषदेंतर्गत पूर्ण केलेल्या ७७ लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (दि.१२) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषद सदस्या सुषमा शहाजी लोंढे यांच्या निधीतून तामलवाडी ते पिंपळा बु रस्ता डांबरीकरण, जिल्हा परिषद शाळेसाठी २ वर्गखोल्या, गावांतर्गत सिमेंट रस्ते, नाली, समाज मंदिर आदी ७७ लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून त्याचे लोकार्पण आमदार पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, काटी जि.प. सदस्य राजकुमार पाटील, पंचायत समिती उपसभापती शिवाजीराव साठे, बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन मसुते, दत्तात्रय वडणे, अब्बास पटेल, विकास खंडाळकर, भाजप तालुका उपाध्यक्ष नरसिंग धावणे, विनोद गंगणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत महादेव मसुते यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...