आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भूम व वाशी येथे आ. तानाजी सावंत यांचा जनता दरबार ; वाशीमध्ये 220 केव्हीए केंद्राची मागणी

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात भरवण्यात आलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या जनता दरबारास शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जनता दरबारात विविध विभागाच्या १२८ तक्रारी दाखल होऊन बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. शहरात शुक्रवार, दि. ३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आ. तानाजी सावंत यांच्या जनता दरबारास माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील महिला, जेष्ठ नागरिक तसेच शेतकरी बांधवांनी रितसर अर्जाद्वारे स्वतः हजर राहून अडचणीचे निवेदन आ. तानाजी सावंत यांना दिले. सामुहिक शेततळे,साठवण तलाव,घरकुल बांधणी,शेतीवीज, रस्ते, निराधार पगार, विविध प्रमाणपत्रे, पिक कर्ज तसेच शहरातील २२१ सर्वे नंबर मधील मुद्दा गटनेते संजय गाढवे यांनी उपस्थित केला. या वेळी शिवसेना जिल्हा समन्वयक दत्ता साळुंखे, शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके, बालाजी गुंजाळ, रामचंद्र घोगरे, रामकिसन गव्हाणे,डॉ. चेतन बोराडे, निलेश चव्हाण, अर्चनाताई दराडे, विशाल ढगे, युवराज तांबे, उपस्थित होते. जनता दरबार सव्वाचार तास चालू होता.

वाशीमध्येही शिवसेना आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा जनता दरबार शनिवारी (दि.०४) येथील तहसील कार्यालयामध्ये पार पडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्याच जास्त तक्रारी असल्याचे पाहावयास मिळाल्या. तरीही महावितरण हे तक्रारींचे केंद्र बिंदू ठरले.यावेळी अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील व उपकार्यकारी अभियंता रमेश शेंद्रे याना मात्र आ. सावंत यांच्यासह उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.या वेळी विरोधी गटनेते नागनाथ नाईकवाडी,नगरसेवक शिवहार स्वामी,सतीश शेरकर,विकासराव मोळवणे,तहसीलदार नर्सिंग जाधव,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू,पोलीस निरीक्षक सुरेश दळवे,नगरपंचायत चे मुख्याधिकारी गिरीश पंडित,पारा,पारगाव,तेरखेडा,वाशी या ठिकाणच्या राष्ट्रीय कृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिव्हाळ्याचा असलेला विजेचा प्रश्न हा येथील शिवसेनेचे प्रशांत चेडे यांनी मांडला. महावितरण कडून कायम खंडित विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. देखभाल दुरुस्तीची केवळ बिले उचलली जात आहेत हे निदर्शनास आणून देत वाशी शहरामध्ये २२० केव्हीए विद्युत केंद्र मंजूर करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...