आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना लोकसहभागातून राबविण्यात येणार:रिचार्ज शाफ्ट कामांचा शुभारंभ; जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये अटल भूजल योजना

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विद्यमाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत उस्मानाबाद जिल्हयातील ५५ गावांत अटल भूजल योजना राबविण्यात येत आहेत.या योजनेअंतर्गत अंमलबजावणी टप्प्यातील मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) कामे करण्यात येणार आहेत या अनुषंगाने दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी जागजी ता.जि.उस्मानाबाद येथे रिजार्च शाफ्ट कामाचा शुभारंभ वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड व जागजी सरपंच लक्ष्मण बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. हे काम ५५ गावांत करण्यात येणार आहे. मासिक बैठक / ग्रामसभेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या जलसुरक्षा आराखडा मधील समाविष्ठ केंद्र व राज्य शासनाच्या विविध पुनर्भरण उपाययोजना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहेत.

यामुळे भूजलाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी सांगितले. तर यावेळी सरपंच लक्ष्मण बनसोडे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.शिंदे, कचरु हिंगे, मारुती लहाडे शेतकरी, डॉ. मेघा शिंदे सहा. भूवैज्ञानिक, आर.बी.शेटे कनिष्ठ भूवैज्ञानिक, ब्रम्हदेव माने आयइसी तज्ञ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...