आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्यावतीने समाजात वाचन संस्कृती वाढविणे व रुजवण्यास मागील चार वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात आहेत. वाचनालयाच्या १३ शाखा,वाचन टपरी,पुस्तक पालखी, ग्रंथदिंडी, विवेकयात्रा, पुस्तक गुढी, पुस्तक अशा अनेक संकल्पना वाचनालयाने राबवल्या आहेत.
वाचनालयाच्या उद्दिष्टांचा भाग म्हणून शहरातील प्रभाग क्र. एक मध्ये शनिवारी (३) प्रदिप चौधरी यांच्या रावसाहेब हेअर सलूनमध्ये वाचन कट्टा सुरु करण्यात आला. हेअर सलूनमध्ये अनेक गिऱ्हाईक ताटकळत बसलेले असतात. तसेच सकाळच्या वेळी अनेक लोक हेअर सलूनमध्ये असेच गप्पा मारीत बसलेले असतात. अशा नागरिकांसाठी हेअर सलूमध्ये वाचन कट्टा सुरु करण्यात आला. सलूनमध्ये अन सलूनच्या बाहेरील कट्ट्यावर बसून पुस्तके व वर्तमानपत्रे वाचण्याची सोय वाचनालयाच्यावतीने करण्यात आलेली आहे. यावेळी शहरातील प्रभाग क्र. एक मध्ये विविध नागरी व सामाजिक समस्यांना वाचा फोडून समस्या सोडविण्याचे साठी ॲड शीतल चव्हाण फाऊंडेशन शाखेचे ही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शांताबाई चव्हाण, ॲड. शीतल चव्हाण, अशोक कांबळे, अब्बू शेख, फारुख शेख, शंकर दंडगूले, हन्नन शेख, प्रदिप चौधरी, राजू भालेराव दादा माने, आखिल शेख, चांद शेख, खाजामिया शेख, धानय्या स्वामी, तनवीर शेख, दशरथ पवार, विजय चितली, शांतय्या स्वामी जैनबी शैख, चिदानंद स्वामी, यासह नागरिक उपस्थित होते.
वाचकांच्या दृष्टीने उदबोधक उपक्रम सध्याच्या सोशल मिडिया जमान्यात लोकांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. ती जोपासण्यासाठी स्मृती वाचनालयाकडून विविध पातळयांवर उपक्रम राबविण्यात येत असतात. इ वाचनामुळे स्मरणशक्ती कमी होते असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच ते लक्षातही कमी राहते. तेव्हा प्रत्यक्ष पुस्तक वाचन महत्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर हा वाचन प्रबोधन कार्यक्रम लोकांच्या दृष्टीने उदबोधक ठरू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.