आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक विकास निधी:दोन विंधन विहिरींच्या कामाचा शुभारंभ ; प्रभाग क्र. 4 व 17 मध्ये विहिरी मंजूर

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या स्थानिक निधीतून प्रभाग क्र. ४ व १७ मध्ये विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. या विहिरींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.प्रभाग क्रं. ४ मधील विंधन विहिर माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे व प्रभाग क्रं. १७ मधील विंधन विहिर ओम कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे. प्रभाग क्रं. ४ मधील कुरेशी गल्ली येथील विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा वैशाली खराडे व प्रभाग क्रं. १७ मधील विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका आरती कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमीन, ओम कोरे, नगरसेवक अविनाश माळी, माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, ओम कोरे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, भाजप तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, प्रेम लांडगे, दिनेश माळी, परमेश्वर चिकटे, समीर शेख, रब्बानी शेख, हबीब कुरेशी, जुबेर कुरेशी, शिवा कुंभार, मुनीर कुरेशी, राहुल रेणके, मुबारक हिप्परगे, शिवन काडगावे, दत्ता क्षीरसागर, यासिन बागवान, जब्बार बागवान, अकबर जेवळे, तात्या काडगावे, विष्णू कोरे, कलिम शेख व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...