आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:तुळजापुरात बायपास वरून नळदुर्ग रोडला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामाचा शुभारंभ

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या लातूर रोड बायपास वरून नळदुर्ग रोडला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामाचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा हस्ते करण्यात आला. या सर्व्हिस रोडमुळे तुळजापूर शहरात येणारी जड वाहने बंद होणार आहे. यामुळे शहरात घडणाऱ्या अपघातांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

नळदुर्ग रोडवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करण्यात आले. यावेळी युवक नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, पंडितराव जगदाळे, विजय कंदले, औदुंबर कदम, राजाभाऊ देशमाने, नारायण नन्नवरे, आनंद कंदले, शरद जमदाडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, लातूर रोड चौकात उड्डाणपुलाअभावी मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यामुळे लातूर रोड चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

शहरातील अपघात थांबणार
नळदुर्ग रोड वरून बायपास रोडवर जाण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असल्याने अवजड वाहने शहरातून उस्मानाबाद रोडकडे जात होती. या भरधाव वेगातील अवजड वाहनांमुळे शहरात तसेच जुन्या बसस्थानकाजवळ अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. सर्व्हिस रोडच्या कामानंतर शहरातील अवजड वाहतूक बंद होऊन अपघातांची मालिका थांबण्याची आशा व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...