आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोहारा तालुक्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षित जमिनीची देखभाल व विविध प्रकारची विकासकामे व उपाययोजना करण्यासाठी वनविभाग व ग्रामपंचायतची संयुक्त समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे.
धानुरी (ता. लोहारा) ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटुकणे आदींनी यांनी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. दोन दिवस उपाेषण झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते महेंद्र धुरगुडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर वन विभागाने समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ी विविध विकास कामे करण्यासाठी व निगा राखण्यासाठी वन विभाग व ग्रामपंचायत यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. धानुरी, हराळी, मोघा, माळेगांव, वडगाववाडी, विलासपूर पांढरी, हिप्परगारवा, उडरगांव, बेलवाडी, तोरबा, कोंडजीगड, उदतपूर, कानेगाव येथे नियमानुसार समिती स्थापन होणार आहे.
ग्रामसभेत निवडणार समिती समिती स्थापन करताना संबंधीत ग्रामपंचायतीच्या दि. ५ जानेवारी २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभेचा ठराव घेऊन मंजूरीसाठी विभागीय वन अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांचेकडे सादर केला जाईल. त्यांच्याकडील मजूरी प्राप्त झाल्यास व नोंदणीकृत झाल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तिवात येणार आहे. दरम्यान, ही प्रक्रिया वेगाने करावी, याला विलंब झाल्यास आणखी आंदोलन करण्याचा इशारा धुरगुडे यांनी दिला आहे. वन विभागाने पत्र दिल्यानंतर धुरगुडे यांच्या हस्ते आंदोलकांनी फळाचा रस घेऊन आपले आंदोलन संपवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.