आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्करात तरुणांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात शहरात बुधवारी (दि.२१) कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी १० वाजता हे निषेध आंदोलन करण्यात आले. युवकांच्या हातात अग्निपथ योजना रद्द करा, चार वर्षांनंतर पुढे काय?, सैन्यदलात कंत्राटी पद्धत धोक्याची असे फलक देण्यात आले होते. तर पारगावचे सरपंच तथा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सहसचिव पंकज चव्हाण यांनी नागरिक व तरुणांना उद्देशून ही योजना कशी धोक्याची आहे. केंद्र सरकार नागरिकांची कशी फसवणूक करते, या गोष्टींची माहिती देऊन केंद्राकडून देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने घेऊन जाऊन नागरिकांना फसवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी तरुणांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून अग्निपथ योजनेचा निषेध करण्यात आला. तसेच या बाबतचे निवेदन वाशीचे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी अवधूत क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर,भूषण देशमुख यांच्यासह कम्युनिस्ट पार्टी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.