आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:तीन मंडळातील बाधित क्षेत्रांना लवकरच भरपाई

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई ३८ कोटी रुपये शासनाकडून तहसिल कार्यालयाकडे प्राप्त झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. सततच्या पावसामुळे शेतातील खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ पंचनामे करण्यात आले होते.

तालुक्यातील भूम, माणकेश्वर व आंबी या तिन्ही मंडळात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी होऊन सोयाबिन, मूग, उडीद, मका या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा निधी ३८ कोटी १२ लाख ७६ हजार रुपये अनुदान तहसिल कार्यालयाकडे प्राप्त झाले असून तालुक्यातील भूम, माणकेश्वर व आंबी या तीन मंडळातील बाधीत क्षेत्र २५ हजार ९२६ हेक्टर मधील २६ हजार ६२९ शेतकऱ्यांना ३५ कोटी २५ लाख ८९ हजार ७८९ रुपये नुकसानीचे अनुदान दोन दिवसात वाटप करण्यात येणार आहे.

नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या याद्या बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मंडळातील समाईक क्षेत्रातील बाधीत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन शेखापूर सज्जाचे तलाठी एच.बी.देडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...