आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:उपजिल्हा रुग्णालयातील उपचारांविरोधात तक्रार ; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाची आणि नातेवाईकांची आर्थिक लूट करीत हेळसांड केलेली असून याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी प्रियांका संतोष करपे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रियांकर करपे यांनी म्हटले की माझ्या बहिणीची मुलगी ज्योती सतिश जेवरे रा. आलुर ता. उमरगा हिला २७ ऑक्टोबरला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्याच दिवशी बहिणीच्या मुलीचे सिजर करून प्रसूत करण्यात आले. त्यावेळी मुलगी झाली आहे असे सांगण्यात आले. बाळ सुरक्षित असून तीन किलो वजन असल्याचे सांगितले.

या मुलीला यापुर्वीचे एक अपत्य असून मुलगीच आहे. दुसऱ्यांदा सिजर झाल्याने सर्व काही चांगले असल्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. आमच्या सांगण्यावरून त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही सिझरिन झाली असल्याने त्वरित केली. मात्र नर्स किंवा डॉक्टरनी बाळाची तपासणी न करता आम्हाला देण्यात आहे,त्यानंतर दोन तासांनी बाळरोगतज्ञानी बाळाची पाहणी करून शारीरिक आणि मानसिक बाळ व्यवस्थित व व्यवस्थित रडले असे सांगितल्याने आम्ही सर्वजण आनंदात होते. त्यानंतर चार-पाच तास उलटले बाळ दुध पित नव्हते व मुत्रविसर्जन करत नव्हते तेंव्हा आमचे निदर्शनास आले की बाळाला संडासची जागा नसल्याचे दिसून आले ही बाब डॉक्टरांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

शासकीय रुग्णालय असून सुद्धा खाजगी तपासण्यासाठी १३०० रूपये घेण्यात आले. सिझरिन करण्याच्या अगोदर डॉक्टरांनी १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठवण्यात आले, त्याठिकाणी सर्जन नसल्याने बाळ अॅडमिट करून घेतले नाहीत. खाजगी रुग्णालयात अॅडमिट केल्यानंतर बाळाची श्वास व अन्ननलिका नसल्याचे आढळून आले व बाळाची गॅरंटी दिली नाही. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी बेजबाबदारीपणे वागल्याबद्दल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...