आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शेतकरी खरिपाची पेरणी करण्यासाठी खते-बियाणे व शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही वेळ कडक ऊन तर काही वेळ ढगाळ वातावरण अशा प्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. तापमानात किंचित घसरण झाली तरी उन्हाची तीव्रता अधिक आहे.
जून महिना अर्धा संपला तरी पाऊस नाही. दररोज ढगाळ वातावरण निर्माण होऊन वारा सुटत आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने दमट वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. हवामान खात्याने यावर्षी लवकरच व भरपूर पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु पाऊस लांबणीवर पडला आहे. शेतजमिनीत ओलावा नसल्याने दमदार पावसाअभावी पेरणी खोळंबली आहे.
असमान वितरण
तालुक्यात पावसाचे असमान वितरण असून पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. ७५ मिमी पाऊस पाऊस व नंतर चांगला वाफसा झाल्याशिवाय पेरणी करू नये.
- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी.
मे मध्येच खरेदी
हवामान खात्याच्या वेळेत पावसाच्या अंदाजामुळे यंदा मे महिन्यातच बी-बियाणे व खते खरेदी केली. शेतीची मशागत करुन ठेवली. परंतु जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही.- दीपक हुरकुडे, शेतकरी, भूम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.