आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय:लोक अदालतीत तुळजापूरमध्ये 289 तर उमरग्यात 209 प्रकरणात तडजोडी

तुळजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या प्रमाणात प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांची सुनावणी

तुळजापूर न्यायालयात आयोजित महालोक अदालतीत २८९ प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. या मध्ये पाच वर्षांपूर्वीची ११ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तर विविध बँकेची, ग्रामपंचायतीची वसुलीबाबतच्या दिवाणी स्वरूपाची १३० दावा पूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. या लोक अदालतीत पहिल्यांदाच सर्व पॅनलवर पॅनल पंच म्हणून महिला विधिज्ञांनी काम पाहिले.प्रारंभी न्यायमूर्ती व्ही. ए. अवघडे यांचा हस्ते दीप प्रज्वलनाने महालोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी न्यायमूर्ती एम. पी. जसवंत, न्या. आर. बी. खंदारे, गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, सरकारी वकिल अमोघसिध्द कोरे, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, नळदुर्ग व तामलवाडीचे पोलिस उपनिरीक्षक, उपस्थित होते.या महालोकअदालतीत एकूण १३८७ व दावा पूर्व एकूण १९७७ अशी एकूण ३३६४ प्रकरणे सामोपचाराने मिटवण्याकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाची १३८७ व दावा पूर्व प्रकरणामध्ये १३० अशी एकूण २८९ प्रकरणामध्ये तडजोड झाली.

धनादेश अनादर प्रकरणात नुकसान भरपाई
विविध बँकेची व ग्रामपंचायतीकडील कर वसुलीबाबतची दिवाणी स्वरूपाची १३० दावा पूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला १३ लाख ६३ हजार ३९५ रुपये वसुली झाली. बँक वसुली प्रकरणामध्ये ८ लाख ९९ हजार २४४ रुपये वसुली झाली. दावा पूर्व प्रकरणा मध्ये ०६ लाख ५८ हजार १९६ रुपयांची संबंधित बँक, ग्रामपंचायतीला वसुली झाली. त्याच बरोबर किरकोळ स्वरूपाचा फौजदारी प्रकरणामध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा झाली. होऊन ५६ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

उमरग्यात २०९ प्रकरणांत तडजोडी
उमरगा अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय, विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (१२) संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत विविध स्वरूपाच्या एकूण २७७० प्रकरणापैकी २०९ प्रकरणात समझोता होत तडजोडी अंती संबंधितांना पाच कोटी ७३ लाख ४६ हजार ९३९ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.दावापूर्व १११७ असे एकूण २७७० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. दिवाणी व फौजदारी १९६ प्रकरणात तडजोड झाली. एकूण १८३ प्रकरणात पाच कोटी ६४ लाख ३६ हजार ७२२ रुपये इतक्या रकमेत तडजोड करण्यात आली तर कौटुंबिक हिंसाचाराची १३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली. दावापूर्व प्रकरणात नगर परिषद सहा, पंचायत समिती तीन, भारतीय स्टेट बँक शाखा मुरूम दोन व उमरगा शाखा एक असे एकूण १२ प्रकरणात एकूण नऊ लाख दहा हजार २१७ रुपये इतक्या रकमेत तडजोड करण्यात आली तर एक प्रकरण निकाली काढण्यात आले. एकूण २७७० प्रकरणांपैकी २०९ प्रकरण तडजोडीअंती सोडवण्यात आली असून संबंधित प्रकरणात पाच कोटी ७३ लाख ४६ हजार ९३९ या रकमेत तडजोड करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश डी. के. अनभुले, दिवाणी न्यायाधीश मनिषा चराटे, सौ एस. ए. कानशिडे, एम. टी. बिलाल, सौ एस. एस .चव्हाण, ए. डी. पाटील यांच्या सहा पॅनेलद्वारे कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

चेक बाऊन्स प्रकरणांत फिर्यादींना नुकसानभरपाईचे आदेश

पहिल्यांदाच सर्व पॅनलवर महिला पॅनल पंच
तुळजापुरात महिला दिनाचे औचित्य साधून पक्षकारांसाठी एका विशेष महिला पॅनल ची स्थापना करण्यात आली होती. या पॅनल मध्ये पॅनल प्रमुख म्हणून एम. पी. जसवंत, महिला पॅनल पंच अॅड. अंजली साबळे व अॅड. के. के. कोरके यांनी काम पाहिले. तर पहिल्यांदाच मुख्यालयातील सर्व तीन पॅनल वर अॅड. एस. एन. साळुंके, अॅड. एस. व्ही. गायकवाड, अॅड. एस. टी. पवार, अॅड. जे. जे. वारूळे या महिला विधिज्ञांनी काम पाहिले. उमरगा येथे सहा पॅनल तयार करण्यात आले होते. सदर पॅनलवर भुसंपादन, कौटुंबिक, धनादेश अनादर, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी व फौजदारी खरूपाचे वाद आणि विविध प्रकारचे प्रलंबित १६५३ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...