आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रासह ९ राज्यात थैमान:भूम तालुक्यात शेतकऱ्यांना चिंता

आबासाहेब बोराडे। भूम22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पशुपालकांत लंपी स्कीन संसर्गजन्य रोगांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूम तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातून लाखाे लिटर दूध बाहेर पाठवले जाते. हे दूध पुरविणाऱ्या पशुधनावर लंपी स्कीन संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह ९ राज्यात थैमान घातले आहे.

या रोगामुळे देशात ४९ हजार ५२६ गायींचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्रातही गायी दगावल्या आहेत. मात्र तालुक्यात याची प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. सध्या तालुक्यात लंपीची एकही केस नसली तरी पशुधन वाचविण्यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात पशुधन असल्यामुळे तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याकडे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पशुपालकांनी मागणी केली आहे.

१. लंपी कशामुळे होतो?
हा राेग, चावणाऱ्या माशा, डास आणि प्रदूषित अन्न व पाण्याद्वारे पसरतो.याचा कालावधी चार ते चौदा दिवसांचाच असतो.

२. लंपी व्हायरस झाल्याची लक्षणे - ताप येणे, भूक कमी होणे, लाळीचे प्रमाण वाढणे, नाकातून स्त्राव होण्याचे प्रमाणही वाढते. गायीचे वागणेही विचित्र होते.याबाबत बाेलताना भूमचे पशुवैद्यकीय अधिकारी डी.के. इंगोले म्हणाले की, तालुक्यासाठी प्रथम १४,३०० लशींची मागणी करण्यात आली असून ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करत चालू आहे. पशुपालकांना तात्काळ आजाराची लक्षणे दिसून आल्यास पशुविद्यकीय दवाखान्यात तात्काळ कळवावे याच्यावर उपचार करून रोखता येऊ शकतो.ज्येतिबाची वाडी येथील शेतकरी बालाजी वरबडे म्हणाले की, २०२० साली आमच्या गोठ्यातील बैलांना झाला होता. यावर उपचार करताना आर्थिक झळ बसते व प्रचंड त्रास होतो. लम्पी आजारा पेक्षा खुरकूत परवडला. शासनाने पशुपालक शेतकऱ्यांना मदत करावी.

बातम्या आणखी आहेत...