आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गोरोबाकाकांच्या यात्रा महोत्सवाची सांगता; प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे महोत्सव सुरळीत

तेर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संत गोरोबाकाकांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाची मंगळवारी अक्षयतृतीयेला उत्साहात सांगता झाली. गोरोबाकाकांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यात्रा महोत्सवादरम्यान गोरोबा काकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी पी. बी. भोसले, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, ग्रामपंचायत सदस्य, उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश, ढोकी ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, एसटी महामंडळ, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने चांगले नियोजन केल्याने यात्रोत्सव उत्साहात पार पडला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एपीआय जगदीश राऊत यांच्या देखरेखीखाली बीट अंमलदार प्रकाश तरटे यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

मंदिराचे प्रशासक भोसलेंचा सत्कार
वारकरी दिंड्यांसह भाविकांना पाणी पुरवठा, सोयीसुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने परिश्रम घेतले. गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप भोसले यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी भाविकांनी अडचण येऊ नये यासाठी नियोजन केले होते. यासाठी अंगणवाडी महासंघाचे राज्य संघटक डॉ. भास्करराव बुकन यांनी मंदिराचे प्रशासक प्रदीप भोसले यांचा सत्कार केला. याप्रसंगी व्यवस्थापक साहेबराव सौदागर, दैवशाला भोरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...