आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिरत्न बौद्ध:त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सिगालवाद सुत्त या निवासी शिबिराची सांगता ;बौद्ध धम्म दीक्षा देऊन उत्साहात

​​​​​​​उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने येथील तगरभुमी कॉम्प्लेक्स,गुंजोटी रोड येथे गुरुवार (२६) पासून सिगालवाद सुत्त विषयावरती निवासी धम्मप्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोमवारी (दि ३०) निवासी धम्मप्रशिक्षण शिबिराची १४ नवंदीक्षिताना बौद्ध धम्म दीक्षा देऊन उत्साहात सांगता करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या अभ्यास शिबिराचे नेतृत्व औरंगाबाद येथील बौद्ध धम्माचें गाढे अभ्यासक साहित्यिक धम्मचारी सुचिरत्न यांनी केले. शिबिरात धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी रत्नपालीत, धम्मचारी ज्ञानपालीत, धम्मचारी कल्याणदस्सी धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध आदींनी मार्गदर्शन केले. शिबीर कालावधीत धम्मचारी धम्मभूषण यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले तर धम्मचारी रत्नपालीत यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य, जीवनावर मार्गदर्शन केले. धम्मचारी विबोध यांनी प्रजापती गौतमी यांच्या जीवनावर सहभागी शिबिरार्थीसमोर विचार मांडून मार्गदर्शन केले. तथागत भगवान बुद्धानी सिगालवाद सूत्तात गृहस्थी लोकांना दिलेला उपदेश शिबिरार्थींना कथन केला. पाच दिवशीय शिबिरात दररोज ध्यान, पूजा, संपर्क सराव, व्यक्तिमत्व विकास आदीवर भर देण्यात आला.या शिबिराचे व्यवस्थापन धम्ममित्र अजिंक्य कांबळे, अमर कांबळे, सुनीता कांबळे, प्रीती मनोहर, तेजस्विनी गायकवाड, प्रदीप गायकवाड हरिदास कांबळे, उत्तम गायकवाड, चंद्रकांत कांबळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...