आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आष्टा जहागीर येथे पारायण सोहळयाची सांगता; अखंड हरिनाम सप्ताह आणि शतचंडी यज्ञ सोहळयाचेही उत्साहाने आयोजन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आष्टा जहागीर येथील दामोदर मठ संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद्भगवद्कथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा कीर्तन, गोपाळकाला, श्रींची पालखी मिरवणूकीसह विविध धार्मिक सोहळ्याने सोमवारी (५) समारोप करण्यात आला.प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून सोमवारी सकाळी ग्रंथ दिंडीची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. ११ ते १२ दरम्यान भागवत कथा ज्ञानयज्ञ महा आरती झाली.

दुपारी दोन ते चार हभप भगवान शास्त्री महाराज नेवासा यांचे काल्याचे कीर्तन सेवा ठेवण्यात आली होती. यावेळी भगवान शास्त्री म्हणाले की,ज्यांनी कृष्ण नामाचे मणी कंठामध्ये धारण केले आहे, त्यालाच खरा काला सेवन करण्याचा अधिकार आहे. तन, मन, धन वाहून भगवान परमात्म्याचे चिंतन केल्यास काल्याचे सार्थक होईल. कंठी धरीला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरुपण करतांना हभप शास्त्री बोलत होते. दिवसभर काळी रोटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.शतचंडी पंचायतन महायज्ञास आरंभ करण्यात आला.

सोहळयाची सांगता सायंकाळी पाच वाजता म्हसोबा मंदिर परिसरात हजारो भक्त भाविकांच्या समवेत काला फोडून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी परमहंस स्वामी गोरक्षनाथ महाराज , दामोदर मठाचे मठाधिपती महंत अवधूतपूरी महाराज, हभप दयानंद माने महाराज, कुलदीप महाराज, जि.प. माजी बांधकाम सभापती ॲड. अभय चालुक्य, माजी पं. स. सदस्या उषाताई गायकवाड, पंसचे माजी उपसभापती युवराज जाधव, सरपंच सतिश जमादार, उपसरपंच बापूराव गायकवाड, माजी सरपंच राधाताई गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य पी. एम. कांबळे, रघुनाथ भालेराव,श्री भजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड यांच्यासह भक्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...