आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ पारायण:आष्टा जहागीर येथे श्रीराम विजय ग्रंथ पारायणाचा ग्रंथ दिंडीने समारोप

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आष्टा (जहागीर) येथील संतयोगी दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती १००८ महंत अवधूतपूरी महाराजांच्या स़ंकल्पनेतून श्रावण समारंभामध्ये श्रीराम विजय ग्रंथ पारायण सुरू करण्यात आले होते.श्री राम विजय ग्रंथ सोहळ्यात नित्यनेमाने ग्रंथाचे वाचन, श्रवण ४० दिवस सायंकाळी दररोज सुरूच होता. श्रीराम विजय ग्रंथाचा रविवारी (११) सकाळी गावातील प्रमुख मार्गाने टाळमृदंगाच्या गजरात श्री राम नाम जयघोष करत समारोप करण्यात आला. यावेळी संतयोगी दामोदर मठाधिपती महंत अवधूतपूरी महाराज ग्रंथ, वाचक ज्ञानेश्वर गायकवाड, हिरानाथ गायकवाड, सरपंच, उपसरपंच बापूराव गायकवाड, कमलाकर गायकवाड, विश्वभंरराव जाधव, विनेकरी रमेश गायकवाड, पांडुरंग गायकवाड, सोनाजी जाधव, उमेश जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...