आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने परिसर मुलाखतीचे आयोजन दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. यासाठी आयसीआयसीआय बँक, महिंद्रा कोटक बँक, एचडीबी फायनान्स आणि आयबीपी या चार बँकाचे अधिकारी मुलाखती घेण्यासाठी येणार आहेत. यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थ्यांना व परिसरातील सर्व पदवीधर उमेदवारांना मुलाखतीमध्ये सहभागी होता येणार आहे. नोकरीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांनी ११ नोव्हेंबर सकाळी नऊ वाजता मूळ कागदपत्रासह हजर राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.