आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:तपस्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिली आल्याबद्दल गौरव‎

परंडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा गांधी‎ विद्यालयाची तपस्या पाटील‎ शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून‎ पहिली आल्याबद्दल तिचा ‎विद्यालयाच्या वतीने सत्कार‎ करण्यात आला.‎ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ‎यांच्याद्वारा आयोजित पूर्व माध्यमिक ‎शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता‎ आठवीतील २०२२ मध्ये तपस्या‎ पाटील हिने २९८ गुणांपैकी २५८ गुण‎ संपादन केले. उस्मानाबाद जिल्ह्यात‎ शहरी विभागातून तिने प्रथम क्रमांक‎ मिळवला.

यशाबद्दल पालक‎ विजयकुमार पाटील व तपस्या हिचा‎ शाळेच्या वतीने सत्कार करण्यात‎ आला. तपस्या हिला शिक्षक‎ गायकवाड, गरड , बाळाबाई व‎ ठाणांबीर यांचे मार्गदर्शन लाभले.‎याप्रसंगी मुख्याध्यापक आर. के.‎ घाडगे, उपमुख्याध्यापक बी. एम.‎ लोकरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचारी उपस्थित होते. तपस्याला‎ कठोर परिश्रमाचे फळ मिळाले.‎

बातम्या आणखी आहेत...