आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अपघात विरहित 25 वर्षे सेवा केल्याबद्दल सत्कार

भूम24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आगारातील चालक विजयानंद आठवले यांना अपघात विरहित २५ वर्ष सेवा केल्याबद्दल परिवाहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भूम आगारातील चालक विजयानंद गोरख आठवले यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी बजावलेल्या अपघात विरहित सेवेमुळे राज्य परिवाहन महामंडळाची जनमानसातील प्रतिमा उंचावली आहे.

यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्या बद्दल त्यांच्या या असामान्य कर्तृत्वाबद्दल राज्य परिवाहन महामंडळातर्फे सपत्नीक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विजयानंद आठवले हे या पुरस्कारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून एकमेव आहेत. या वेळी परिवहनमंत्री अनिल परब, भा. प्र. से. शेखर चन्ने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...