आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी कारवाई:सोनियांवर ईडी कारवाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवारावर सरकार व सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासदार सोनिया गांधी यांनी ईडीला सहकार्य केले. तरीही वारंवार चौकशीला बोलावून त्रास दिला जात आहे. १९३८ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव यांनी हे वृत्तपत्र सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...