आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत द्या:हेक्टरी 50 हजार मदतीसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक; ​​​​​​​ मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

तुळजापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीच्या मागणीसाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, जुलै, ऑगस्ट महिन्यात सततच्या पावसाने पिकांचे संपूर्ण नुकसान झाले.

खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर यापुढे रास्ता रोको, आमरण उपोषण यासारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिला. तहसीलदार सौदागर तांदळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, आनंद जगताप, रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, अमोल कुतवळ, लखन पेंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व बाजूने शेतकरीच हवालदिल
हंगाम कोणताही असो, शेवटी शेतकरीच नाडला जातो हे आतापर्यंत अनेकवेळा दिसून आले आहे. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतात पाणी साचले. त्याचा निचरा नीटपणे झाला नाही. पिके पिवळी पडली, उसाला तुरे फुटले, शंखी गोगलगायीसह विविध रोगाने पिके उभी पिके नष्ट झाली. महागडी खते आणि बियाणे वापरून आणि भरमससाठ कर्ज घेऊन उभी केलेली शेते मातीमोल झालेली पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकारही घडले आणि घडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...