आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रुफ टॉप सोलर योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरू; महावितरणचे लाभ घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या किंवा दुकानाच्या छतावर सोलर पॅनल उभारून वीजनिर्मिती करण्याची संकल्पना आता रूजू लागली आहे.महावितरणकडून यासाठी अनुदान मिळत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२८ ग्राहकांनी वीज निर्मिती केली असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. दरम्यान, रूफ टॉप सोलर योजनेसाठी ग्राहकांकडून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

वीज ग्राहकांसाठी फायद्याची ठरणाऱ्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु आहे. Mahadiscom.in/ismart या संकेत स्थळावर अर्ज आणि या योजनेबाबतची तपशीलवार माहिती ग्राहकांना उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प घेता येतो. यातील केवळ घरगुती ग्राहकांना सबसिडी देण्यात येते. तीन किलो वॅटपर्यंतच्या सोलर पॅनलसाठी ४० टक्के आणि त्यावरील १० किलो वॅटपर्यंतच्या सौरपॅनल प्रकल्पासाठी २० टक्के सबसिडी देय आहे. त्यासाठी अधिकृत एजन्सीमार्फत स्वदेशी बनावटीच्या सौर मोड्युल्सचा वापर करणे अनिवार्य असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर केल्यास आर्थिक बचतीसह पर्यावरणाचेही संवर्धन होते.

विभागात ६७२ ग्राहकांनी बसवले रूफ टॉप
लातूर परिमंडलातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून ६७२ ग्राहकांनी रुफ टॉप सोलारच्या मांडणीसाठी अर्ज केले आहेत. लातूर परिमंडलातर्फे नेमण्यात आलेल्या ३५ एजन्सीमार्फत त्यावर काम करण्यात येत आहे. आजपर्यंत कार्यान्वित करण्यात आलेल्या रुफ टॉफ सोलार मधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात आली आहे. परिमंडलात मे २२ या महिन्यात २३४५ ग्राहकांच्या छतावरुन १४११६८४५८ युनिट विजेची निर्मिती झाली. त्यात लातूर जिल्ह्यात १६७१ ग्राहकांच्या छतावरुन १३९६७८५९० युनिट, बीड जिल्ह्यात ४४६ ग्राहकांच्या छतावरुन ९१९७७४ युनिट तर उस्मानाबाद जिल्ह्यात २२८ ग्राहकांच्या छतावरुन ५७००९४ युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...