आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोथिंबीर महागली, शंभरी गाठलेले वांगे रु. 20 वर

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबरमध्ये १०० रुपये किलोवर गेलेल्या वांग्यांची आवक सध्या वाढली असून २० रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे शेतातून तोडणी करून बाजारपेठेत आणण्याचा खर्चही निघत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत वांगे ५ ते १०, टोमॅटो ३ ते ७, कोबी ७ ते १० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

अतिवृष्टी व सततच्या ढगाळ वातावरणामुळे दोन आठवड्यापूर्वी सर्वच भाजीपाल्यांचा दर्जा घसरला होता. सध्या बाजारपेठेत माल चांगला येत आहे. मात्र, आवक वाढल्याने दर अत्यंत कमी झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती निरीक्षकांशी चर्चा केली असता कोथिंबीर सोडता सर्वच भाज्यांची आवक वाढल्याचे सांगितले. यंदा जून ते ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यांचे उत्पन्न कमी झाले होते.

नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात गारठा जाणवला असून स्वच्छ वातावरण होते. यामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची उत्पन्न वाढले आहे. यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. जिल्ह्यात भेंडी, कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, दोडका, घेवडा यासह इतर भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी मशागतीसह खत, कीटकनाशकांसाठी केलेला खर्च तर सोडा तोडणीकरिता मजुरी व बाजारपेठेत नेण्याचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये अधिक काळ ढगाळ वातावरण राहिल्याने टोमॅटोवर ओला करपा व टुटा अळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे टोमॅटोवर काळे डाग निर्माण होत होते. सध्या बाजारपेठेत दर्जेदार टोमॅटो उपलब्ध होत आहेत. मात्र, त्याला अपेक्षित भाव मिळेनासा झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहेत. एक महिन्यापूर्वी ८० ते १०० रुपये किलो असणारी वांगी घसरुन २० रूपयांवर आली आहे.

लागवडीचा टायमिंग चुकल्याने तोटा
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हंगामी भाजीपाल्याची लागवड करतात. यामुळे एकदाच अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समीतील दाखल होतो. परिणामी योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांनी बारमाही भाजीपाला घ्यावा. यामुळे चांगला भाव मिळेल. यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. सध्या मुबलक पाणी असल्याने बारमाई भाजीपाला घेता येऊ शकतो.

उत्पादन खर्च कमी करण्याची गरज
शेतकऱ्यांचा माल बाजारात आला की दर कमी होतात. यामुळे शेतकरी तोट्यात जात आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाल्याची लागवड करण्याची गरज आहे. हंगामी भाजीपाल्याऐवजी बारमाई भाजीपाल्याची लागवड केल्यास उत्पन्न मिळेल.-छत्रगुण शिंदे, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...