आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:कोरोनाने हिरावले आई-वडील, आजीचे छत्र; संघर्षातून दहावीत 90 टक्के गुण

ईट8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भूम तालुक्यातील दांडेगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. एकाच आठवड्यात आई-वडील व आजीला कोरोनाने हिरावून नेल्याने कुटुंबातील दोन मुले पोरकी झाली होती. या दु:खातून सावरत परिस्थितीशी संघर्ष करत या कुटुंबातील मकरंदने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

दांडेगाव येथील शिक्षक असलेले आबासाहेब भोगील यांचे २०२१ मध्ये कोरोनाने निधन झाले होते. त्यापाठोपाठ त्यांची पत्नी व आईलाही कोरोनाची लागण झाली. यात त्यांचेही निधन झाले. आबासाहेब भोगील यांचा मुलगा मकरंद हा त्यावेळी दहावीला होता. या कठीण प्रसंगी त्याने संयम राखत दहावीचे वर्ष पूर्ण केले. त्याने दु.ख बाजुला सारत चिकाटीने अभ्यास केला व दहावीत ९०.६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. प्रतिकूलतेवर मात करत मकरंद याने यश मिळवले आहे. यामुळे त्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे. यशाबद्दल शाळा व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. त्याने शिवपार्वती विद्यालयात शिक्षण घेतले.

बातम्या आणखी आहेत...