आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संसर्ग:कोरोना रुग्ण वाढले, 34 उपचारात

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दिवाळी संपेपर्यंत कोरोना संसर्ग संपल्यासारखी स्थिती होती. केवळ दहा रुग्ण उपचारात होते. बाधितांची संख्या नियमित एक-दोन होती. मात्र, आता रुग्ण वाढत असून गुरुवारी नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या ३४ जण उपचारात आहेत.

जून महिन्याच्या मध्यंतरी कोरोनाची चौथी लाट आली. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्यास प्रारंभ झाला होता. मात्र, यात सौम्य लक्षणं असल्याने तसेच गंभीर रुग्ण नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला होता. शेवटच्या टप्यात असलेल्या या लाटेत रविवारी एकाच दिवशी १७ रुग्ण आढळून आले. तसेच गुरुवारी नऊ रुग्ण आढळले.

त्या तुलनेत बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या कमीच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७५ हजार ९५६ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७३ हजार ८०३ कोरोनामुक्त झाले. गुरुवारी उमरगा तालुक्यात तीन, उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी दोन तर लोहारा आणि परंडा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. उर्वरित तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. बाधितांमध्ये ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तसेच एका १५ वर्षीय मुलीचाही समावेश आले.

विशेष म्हणजे दिवसभरात आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल ३२२ अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांची घाबरुन न जाता केवळ काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...