आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोजा टाकण्याकडे सर्वांचे लक्ष:कराळीत पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार ; अद्याप पैसे भरले नाही

उमरगा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कराळी ग्रामपंचायतीत सन २००५-०६ मध्ये पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला. चौकशी करून संबंधितांकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्यासाठी पत्र देऊनही पैसे भरले नसल्याने प्रशासन वसुलीसाठी बोजा टाकण्यात येत असून याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनास दिलेल्या तक्रारी अर्जात माजी सैनिक विश्वनाथ वडदरे, ग्रामस्थांनी म्हटले होते की, कराळी ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा योजनेत सरपंच सुभाष लोकु राठोड व विमलबाई चव्हाण यांनी सन २००५-०६ तत्कालीन पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, सचिव असताना ४० लाखांच्या योजनेत सहा लाखांचा भ्रष्टाचार केला. चौकशी करून संबंधीतांनाकडून ती रक्कम वसूल करा, असे म्हटले होते.

चौकशीअंती अपहारातील पाच लाख ६४ हजार १६४ रुपये भरण्याची नोटीस देत विनंती करूनही शासनाकडे रक्कम भरली नाही. या विरोधात वडदरे, कराळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हा प्रशासनाने सुभाष लोकु राठोड, विमलबाई चव्हाण यांच्या ७/१२ उताऱ्यावर प्रत्येकी दोन लाख दोन हजार ८२ रुपये बोजा चढवण्याचे आदेश दिले. राठोड यांच्या नावे स.न. ३१ ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवला. चव्हाण यांच्या नावे जमीन नसल्यामुळे दोन लाख दोन हजार ८२ रुपयांचा बोजा मालमत्तेवर घेणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...