आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेषभूषा:सह्याद्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या वेषभूषा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापिका आशा इंगळे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिकेतून विविध संदेश दिले.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन, कोविड-१९ जनजागृती अशा विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिका सादर केल्या.

बेडके शिवन्या, तांबोळी अक्सा, तकदीस फातेमा शेख, ईश्वरी गव्हाणे, अफिफा शेख, धम्मसंगिनी वाघमारे, सिद्धांत वाघमारे, मानसी कापसे या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुवर्णा गायकवाड तसेच परीक्षक म्हणून प्रतीक्षा आरेकर उपस्थित होत्या.सूत्रसंचालन वेदिका लावंड, ईश्वरी लावंड, मानसी सूर्यवंशी, इफरा शेख, या विद्यार्थिनींनी केले.तसेच आभार ललिता शिंदे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...