आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:डोंजा येथे लम्पी आजाराने गाय दगावली, भीतीचे वातावरण

डोंजा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील डोंजा येथे लम्पीच्या आजाराने एक गाय दगावली असुन पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून अगोदरच जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरही असा प्रकार घडला.डोंजा येथील शेतकरी हनुमंत पौळ यांची गाय दगावली असून पाच लाख रुपयाचे नुकसान झाले. लम्पी आजार झाल्यापासून हजारो रुपयांचा खर्च करत वारंवार काळजी घेतली जात आहे. सर्व प्रयत्न करुनही गायीचे प्राण वाचू शकले नसल्याचे पौळ यांनी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. घटनास्थळी सहाय्यक पशुधन अधिकारी एस. जी. बनसोड यांनी पंचनामा केला.

तसेच लंम्पी हा आजार पशूंमध्ये होणारा संसर्गजन्य रोग असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांनी सजग राहण्याचे आवाहन यावेळी केले. पशुपालक व शेतकरी यांनी घाबरून न जाता लम्पी आजाराचा घरगुती उपचार केल्याने सुद्धा बरा करता येऊ शकतो. लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांना ताप येतो, दुध कमी होते. जनावरांच्या अंगावर गाठी येतात, चिलटे, माश्या, गोचीड आणि डासांद्वारे लम्पी रोगाचा प्रसार होतो. संबंधित पशुपालकास आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी आर. जगदाळे, एस.ए. देशमुख, मंगेश भोसले, रणजित चव्हाण, शाहरूख शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...