आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांमधून संताप:पाचुंदा तलावाच्या सांडव्याला पडल्या भेगा, गळतीने जलपातळी खालावली; चार वर्षांपूर्वी सांडव्याची दुरुस्ती करूनही गळती कायम

काक्रंबा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूरपासून दोन किलोमीटरवर असलेला पाचंुदा तलाव यावर्षी तुडुंब भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मात्र या तलावाच्या सांडव्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तलावाच्या सांडव्यातून एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना सांडव्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातून संताप व्यक्त होते आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळात परिसरातील शेतकऱ्यांनी पाचंुंदा तलावातून स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात गाळ काढला आहे. तसेच नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम काढण्यात आल्याने तलावाची साठवण क्षमता तिपटीने वाढली आहे.

तलावातून तुळजापूरला १२ महिने पाणीपुरवठा करण्यात येतो. शिवाय या तलावाच्या पाण्यावर काक्रंबा, तडवळा, हंगरगा तुळ या गावांची मदार आहे. यावर्षी जोरदार पावसामुळे पाचुंदा तलाव तुडुंब भरला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. परंतु प्रशासनाने या तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष चालवले आहे. तलावाच्या सांडव्याला भेगा पडून त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

गाळ काढल्याने साठवणक्षमता तिपटीने वाढली
चार वर्षांपूर्वी दुष्काळात परिसरातील शेतकऱ्यांनी पाचंुंदा तलावातून स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात गाळ काढला आहे. तसेच नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम काढण्यात आल्याने तलावाची साठवण क्षमता तिपटीने वाढली आहे. तलावातून तुळजापूरला १२ महिने पाणीपुरवठा करण्यात येतो. शिवाय या तलावाच्या पाण्यावर काक्रंबा, तडवळा, हंगरगा तुळ या गावांची मदार आहे.

दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
पांचुदा तलावाच्या सांडव्याला अनेक वर्षांपासून भेगा पडल्या आहेत. सांडव्याच्या भिंतीत निलगिरीसह बाभळी, काटेरी झाडेझुडपे वाढल्याने सांडव्याची भींत कमकुवत झाली आहे. सध्या सांडव्यातून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. चार वर्षांपूर्वी सांडव्याची दुरुस्ती केली होती. परंतु दुरुस्तीचे काम निकृष्ट केल्याने पुन्हा पाणीगळती सुरू झाल्याने दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे.

निविदा निघाली, लवकरच काम
पाचुंदा तलाव सांडवा दुरुस्तीचा प्रस्ताव जुलैमध्येच पाठवला होता. सध्या याची ऑनलाइन निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
स्वप्निल कुंभारे, अभियंता, जलसंधारण विभाग.

बातम्या आणखी आहेत...