आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नजीकच्या काळात सामाजिक तेढ निर्माण; दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह संदेश थांबवण्याचे अधीक्षकांचे जनतेला आवाहन

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हा हा अत्यंत शांतताप्रिय असून सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. नजीकच्या काळात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनेतून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ला वेगळं ठेवून त्यांचा समंजसपणा व सामाजिक सलोखा दाखवलेला आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या जातीय घडामोडी संदर्भाने सुध्दा आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखविणारे, तसेच भडकावू किंवा जिल्ह्यातील शांतता भंग करणे किंवा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे अक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे, छायाचित्रीकरण अशा माहितीची शहानिशा न करता सामाजीक प्रसार माध्यमांवर ती माहिती प्रसारीत करु नये.

उस्मानाबाद पोलिस दलामार्फत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विीटर, व्हॉट्सॲप इत्यादी सामाजिक प्रसार माध्यमांवर देखरेख करण्यात येत असुन सर्व सामाजिक प्रसार माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सामाजिक प्रसार माध्यमांवरुन विवाद होईल अशी माहिती माहीती प्रसारीत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वांनी उस्मानाबाद जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिस दलास सहकार्य करावे. असे आवाहन अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे.

बातम्या आणखी आहेत...