आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:गेटला कुलूप ठाेकणाऱ्या 11 शिवसैनिकांवर गुन्हा ; शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकणाऱ्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांसह ११ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा शासकीय कामात अडथळा आणल्याचा आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू असताना आनंदनगर पोलिस ठाण्याचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात होते.

तेव्हा माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, सचिन शेंडगे, गजेंद्र जाधव, सागर बाराते, प्रविण कोकाटे, गणेश साळुंके, अजित बाकले, संदिप देशमुख, रणजित महाडिक या सर्वांनी संगनमताने तेथे जाउन मोठमोठ्याने आरडाओरड करुन मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटला कुलूप लावून शासकीय कामकाज करण्याकरीता कार्यालयात जाण्यायेण्यास अडथळा केला. यावरुन आनंदनगर ठाण्याचे पोलिस अंमलदार अमोल कुंभार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...