आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:मंकावती कुंड हडपल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरींवर गुन्हा, कारवाईवरील स्थगिती उठवल्यानंतर रात्रीच प्रक्रिया

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्राचिन मंकावती कुंड हडपण्याच्या प्रकरणात माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते देवानंद रोचकरी यांच्यावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरविकास मंत्र्यांनी सुनावनी घेतल्यानंतर कारवाईवरील स्थगिती उठवण्यात आली. यानंतर लगेच मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले.

नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी उ. ना. सर्दळ यांनी स्थगिती उठवल्याचे आदेश मंगळवारी दुपारी काढले. यानंतर तुळजापूरचे मुख्याधिकारी आशिष लोकरे व अन्य पालिका कर्मचारी देवानंद रोचकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी रोचकरी व अन्य आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि. ९) ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली होती. कोणतीही नोटीस न देताच तसेच प्रतीवादीचे म्हणणे ऐकून न घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी नगरविकास मंत्र्याकडे अपिल करत याप्रकरणी कारवाईला ३ ऑगस्टला स्थगिती मिळवली होती.

मुळ दस्तवेजात फेरफार करत बनावट कागदपत्राच्या आधारे प्राचिन मंकावती कुंड नावावर केल्याच्या प्रकरणी आरोप करत महंत सावजीनाथ व इतरांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे ३१ मे रोजी तक्रार केली होती. व बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. यासाठी नियुक्ती समितीच्या अलवालावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रोचकारी यांनी यावर स्थगिती मिळवली होती. अखेर मंगळवारी दुपारी स्थगिती उठवली. यामुळे कारवाईचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकारी आशिष लोकरे व पालिका कर्मचारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत ते तळ ठोकून होते.

बातम्या आणखी आहेत...