आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा‎

धाराशिव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा‎ तालुक्यातील भुसणी येथील‎ सुधाकर साधु पारधे (५५) यांनी‎ १० मार्चला शेतात गळफास घेत‎ आत्महत्या केली होती. या‎ प्रकरणात सुधाकर यांचे त्यांचा‎ भाऊ मधुकर साधु पारधे, सुजाता‎ पारधे, उत्रेश्वर जोगदंड हे‎ शेतजमीन वाटणी व उसाच्या‎ पट्टीवरून भांडण झाले होते.‎ तसेच मधुकर यांच्याकडून‎ होणाऱ्या त्रासामुळे सुधाकर यांनी‎ आत्महत्या केल्याची तक्रार‎ त्यांचा मुलगा राजेंद्र यांनी मुरूम‎ पोलिस ठाण्यात दिली होती.‎ त्यानुसार पोलिसांनी शनिवारी‎ गुन्हा दाखल केला आहे.‎

मधुकर यांना १३ जणांची‎ मारहाण: या प्रकरणात भुसणी‎ येथील शेखर देडे, नामदेव‎ जाधव, रमेश बिराजदार,‎ नबीलाल मुल्ला, अनिल बिराजदार यांच्यासह‎ अन्य आठ जणांनी ‘तुझ्या भावाने‎ तुझ्यामुळे फाशी घेतली’, असे‎ म्हणत मधुकर साधु पारधे व पत्नी‎ सुजाता, मेव्हणा यांना शिवीगाळ‎ करून लाथाबुक्क्या, दगड, काठीने‎ मारून गंभीर जखमी केले. जीवे‎ मारण्याची धमकी दिली. तसेच‎ मधुकर यांच्या बोलेरो गाडीवर‎ कडबा टाकून आग लावून जाळली.‎ या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...