आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चोरीच्या दुचाकीसह  सराईत गुन्हेगार अटकेत

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी आनंद पोलिस ठाण्याचे पथक रविवारी गस्तीवर असताना मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या आडोशाला एक इसम संशयित रित्या आढळला. त्याची विचारपूस केली असता तो परभणीचा असून त्याने दुचाकी चोरुन आणल्याचेही समोर आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांच्यासह पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी एका तरुणावर संशय आल्याने त्याची व दुचाकीची अधिक माहिती घेतली. त्यात बालाजी विष्णु माने, वय ३२ वर्षे, रा. संत गाडगेबाबानगर, परभणी असे असल्याचे समजले. तसेच त्याच्या जवळील दुचाकी बाबत योग्य माहिती दिली नाही. पोलिसांनी इंजीन व सांगाडा क्रमांकावरून अधिक माहिती घेतली असता दुचाकी परभणी जिल्ह्यातून चोरीस गेल्याचे समजले. माने याने ती परभणी रेल्वे स्थानकावरून चोरल्याचेही सीसीटीव्हीवरून समोर आले. यापूर्वी त्यावर चोरी, जबरी चोरी केल्याचे १२ गुन्हे दाखल असल्याचे समजले. एकंदरीत बालाजी हा सराईत गुन्हेगार असल्याचे कळताच आनंदनगर पोलिसांनी त्या चोरीच्या दुचाकीसह बालाजी यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...