आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. राणाजगजितसिंह पाटील यांना विश्वास:पीकविमा; शेतकऱ्यांना न्याय मिळेल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप २०२० चा पीक विम्यासंदर्भात विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले असून, यासंदर्भात ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होत आहे. या खटल्यात शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशाच्या मान्यतेसाठी फेरप्रस्ताव दाखल करत आहोत, यावर्षीचे प्रवेश सुरू होतील, असे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

आमदार पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, ॲड. व्यंकटराव गुंड, ॲड. खंडेराव चौरे, युवराज नळे, सुरेश देशमुख उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, तुळजापूर तालुक्यातील एका बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना गंभीर असून, प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष तज्ञ वकिलांची नेमणूक करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. त्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले असून त्यांचे पालकत्व मी स्विकारले आहे.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. राज्य सरकारने पीक नुकसान पोटी जाहीर केलेली मदत १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. २०२१ ची राहिलेले ३३० कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम रखडली होती. ती देखील लवकरच मिळेल. तर २०२१ सालच्या पीक विम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून ते ५ सप्टेंबरपासून कायदेशीर कारवाई सुरु करतील. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी जिओ टॅगिंन निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

रेल्वेसाठी राज्याचा हिस्सा लवकरच
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला ५० टक्के निधी देण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेऊन तो निधी सीएसआर निधीतून उपलब्ध करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...