आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पीक विमा, हायवे कामासाठी टोलनाके ‘बंद’चा इशारा ; काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमरग्यात रास्ता रोको

उमरगा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा-लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य शासन विरोधात विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, तालुकाध्यक्ष संजय पवार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या उपस्थितीत सोमवारी(दि.७)शहरातील अशोक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कार्यकर्त्यांनी रस्ता अडल्याने वाहतूक दीड तास ठप्प होती.

मुख्यमंत्र्यांना निवेदनात म्हटले आहे की, आता खोके सरकार भाजप सरकारचे हस्तक आहे. महाराष्ट्रातातील उद्योगधंदे गुजरातला हलवून येथील युवकांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र आहे. राष्ट्रवादी ८ वर्षांपासून महामार्ग कामासाठी आंदोलन करत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास १२ डिसेंबरनंतर टोलनाके बंद करू. आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी केले. शिंदे-फडणवीस सरकार पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. स्वतःची घर भरणाऱ्या सरकारला शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत तालुकाध्यक्ष साळुंके यांनी व्यक्त केले.

ओला दुष्काळ जाहीर करा, २०२० चा शिल्लक पीकविमा द्या, महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, गुणवत्ता नियंत्रक विभाग अधिकाऱ्यांना निलंबीत करा,महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण होईपर्यंत टोलनाके बंद करा, रस्त्याची दुरुस्ती करा, आदी मागण्या केल्या. आंदोलनात भीमा स्वामी, बापू बिराजदार, गोविंद साळुंके, बाळासाहेब स्वामी, अच्युत साठे, खाजा मुजावर, शंतनू सगर, धीरज बेळंबकर, सुनिता पावशेरे, मोहन जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...