आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन:अतिवृष्टीने पिके पाण्यात, किडींमुळे नुकसान; पंचनामे करून भरपाई द्या; शेतकरी संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा व उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने व गोगलगाय किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. गुरुवारी (दि.४) जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज स्वामी, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे, तालुकाध्यक्ष संजय पवार, सोशल मिडीया जिल्हा उपाध्यक्ष अफसर मुल्ला, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, सरचिटणीस धीरज बेळंबकर, उपाध्यक्ष विष्णू भगत, युवक शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, राजकुमार माने, राहुल बनसोडे, बसवेश्वर माळी, वाघंबर सरवदे, दिपक हिप्परगे, विजयकुमार थिटे, रणजीत बिराजदार, धर्मराज व्हन्नाळे, श्रीराम जगदाळे, शरद पाटील, प्रभाकर माने, खंडू काळे, अनंत भोसले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

शेतकऱ्यांना मदत करा
निवेदनात म्हटले आहे की, उमरगा-लोहारा तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिके पाण्यात गेली आहेत. गोगलगाय व किडींच्या प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.

बातम्या आणखी आहेत...