आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवीचा वाराचा योग साधत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.५) भाविकांनी प्रचंड गर्दी केली.धर्म दर्शनाला सुमारे ३ तास, मुख दर्शनाला १ ते दीड तास तर सशुल्क दर्शनाला १ तास वेळ लागत होता. दरम्यान गर्दीच्या दिवशी मंदिर पहाटे १ वाजता उघडण्याचा निर्णय मंदिर संस्थानने बदलल्याने पहाटे भाविकांच्या भवानी रोडवर रांगा लागल्या होत्या.
कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्यानंतर धार्मिक स्थळे भाविकांनी गजबजली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधाखाली जगणाऱ्या भाविकांनी आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी पहाटेपासूनच प्रचंड केली होती तर दुपारनंतर भाविकांची गर्दी ओसरली. तत्पूर्वी पहाटे ४:३० वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वाजता एकच सामुहिक अभिषेक पूजा घालण्यात आली. सायंकाळच्या अभिषेक पुजेनंतर रात्री उशिरा मंगळवारनिमित्त तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.