आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाने नियोजन चुकले:तुळजापुरात भाविकांची गर्दी, सातत्याने वाहतूक कोंडी, नियोजनाची गरज

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या सुट्यांमुळे आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहेत. नियमित येथे लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यात शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर बेशिस्त पार्किंग यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवरात्रीपासून तुळजापूर शहरातील गर्दी नियमित वाढतच आहे. मध्यंतरी सणामुळे कमी झालेल्या भाविकांची गर्दी आता पुन्हा वाढली असल्याचे दिसून आले. त्यात प्रशासनाने नियोजन केले नसल्याने शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ध्यानात घेऊन शहरातील वाहतुकीचे कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी होत आहे. कोविड - १९ नंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

यामध्ये मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या देवीच्या वारासह रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. अधिक संख्येने येणाऱ्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याचे समोर आले. त्यामुळे याचा फटका भाविकांसह नागरिकांना बसत आहे. मंगळवारी (दि. ०१) तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. धर्म दर्शनाला अडीच ते तीन तास, सशुल्क दर्शनासाठी एक तास तर मुखदर्शनाला एक तास वेळ लागत होता.

अवैध वाहतूक जोमात, भाविकांना दंड
शहरातील रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या भाविकांच्या वाहनांना ऑनलाइन दंड ठोठावण्यात येत असतो. मात्र, त्याच वेळी दीपक चौक, आंबेडकर चौकातील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे पोलिस प्रशासनाकडून मुद्दाम अर्थ पूर्ण दुर्लक्ष होत आहे. दीपक चौक, आंबेडकर चौकात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज
कायमस्वरूपी नियोजन नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील दीपक चौक, कमानवेस, आर्य चौक, भवानी रोड या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गंभीर समस्या उद््भवण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...