आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या उत्साहात तसेच‎ भक्तीभावाने साजरी:श्रीगणेश जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी‎

उस्मानाबाद / नळदुर्ग‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बुधवारी श्री गणेश जयंती‎ मोठ्या उत्साहात तसेच‎ भक्तीभावाने साजरी करण्यात‎ आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी‎ गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी‎ झाली होती. उस्मानाबादेत विविध‎ मंदिरात गणेश जयंतीनिमित्त उपक्रम‎ राबविण्यात आले तसेच तुळजापूर‎ तालुक्यातील नळदुर्ग येथे गणेश‎ जयंतीला मंदिरात भाविकांची गर्दी‎ झाली होती.‎ नळदुर्ग येथे अक्कलकोट‎ रस्त्यालगत असलेल्या गणेश‎ मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या‎ उत्साहात साजरी करण्यात आली.‎ ठाकूर परिवाराकडून दरवर्षी‎ याठिकाणी गणेश जयंती साजरी‎ केली जाते.

यावर्षी बलदेवसिंह‎ ठाकूर यांच्यावतीने भाविकांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाप्रसाद देण्यात आला.धर्मवीर‎ संभाजी गणेश, जय भवानी गणेश‎ मंडळ, भोईराज गणेश मंडळ व‎ लोकमान्य गणेश मंडळ याठिकाणी‎ श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात‎ व भक्तीमय वातावरणात साजरी‎ करण्यात आली. विशेष करून‎ महिला भाविकांनी मोठी गर्दी केली‎ होती.श्री गणेश जयंतीचा मुख्य‎ कार्यक्रम येथील अक्कलकोट‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रस्त्यालगत असलेल्या गणेश‎ मंदिरात पार पडला. शेकडो‎ महिलांच्या भजनाचा कार्यक्रम‎ झाला. श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री‎ विष्णु शर्मा महाराज यांनीही‎ याठिकाणी येऊन श्री गणेशाचे दर्शन‎ घेतले. यावेळी माजी नगरसेवक‎ बसवराज धरणे, सुधीर हजारे, शहर‎ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबुब‎ शेख अादींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...