आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशक्तीची देवता तुळजाभवानी मातेच्या दरबारातून भवानी ज्योत नेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव मंडळांना राजकीय रसद लाभल्याने “भवानी ज्योत” नेण्यासाठी भाविकांचा दांडगा उत्साह पहायला मिळाला.
भवानी ज्योत प्रज्वलित करून अनवाणी चालत नेण्याची प्रथा आहे. नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार सायंकाळपासून ज्योत नेण्यासाठी गर्दी केली होती. शनिवारी रात्रभर ढोल-ताशांचा गजरात ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने तीर्थक्षेत्र तुळजापूर दणाणून गेले होते. नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भगवे गमछा (रुमाल), भगवे टी-शर्ट घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच ज्योती, तेल, प्रसाद खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती. त्यामुळे नवरात्रापूर्वीच व्यावसायिकांत उत्साह संचारला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी
ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींनी नवरात्र उत्सव मंडळांना आर्थिक रसद पुरवल्याने कार्यकर्त्यांतमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.