आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:प्रारूप मतदार याद्या खरेदी साठी इच्छुकांची झुंबड

तुळजापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्या खरेदी साठी इच्छुकांची झुंबड उडाली असून केवळ ०३ दिवसांत ३४ इच्छुकांनी तब्बल ६७ मतदार याद्यांची खरेदी केली आहे. यावेळी प्रभाग रचनेत सर्वच प्रभागांची मोडतोड करण्यात आली असल्याने अनुकूल प्रभागासाठी शोधा शोध चालू केली असून यामुळे अनेक प्रभागाची चाचपणी करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील ०५, ०६, ०७, ०८, ०९ आणि १० या प्रभागांचा मतदार याद्यांना मोठी मागणी आहे तर प्रभाग क्रमांक ०१ व ११ या प्रभागांना मागणीच नसल्याचे समजले. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी ची तयारी जोमाने सुरू असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार निवडणूक आयोगाने नगर पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकी ची तयारी चालवली आहे. या मध्ये प्रारूप मतदार यादी मंगळवार (दि. २१) प्रसिध्द करण्यात आल्या नंतर निवडणूक तयारी ला खर् या अर्थाने वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या खरेदी सुरू केली असून अनूकल प्रभागाची चाचपणी चालू केली आहे.

● ३ दिवसांत तब्बल ६७ मतदार याद्यांची खरेदी, मंगळवार दि. २१ - १३ इच्छुकांनी २३ याद्या खरेदी,बुधवार दि. २२ - १० इच्छुकांनी २१ याद्या खरेदी,गुरुवार दि. २३ - ११ इच्छुकांनी २३ याद्या खरेदी,● तीन दिवसांत १७ हजार ६०० रूपयांचा महसूल जमा झाला. मतदार याद्या साठी प्रती पान २ रूपये प्रमाणे शुल्क आकारण्यात येत असून ०३ दिवसांत ६७ मतदार याद्या च्या विक्री तून तब्बल १७ हजार ६०० रूपयांचा महसूल पालिकेचा तिजोरीत जमा झाला आहे.प्रारूप मतदार याद्या वर २७ जून पर्यंत हरकती सादर करण्यात येणार आहेत तर १ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.