आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा:परंडा ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये दहीहंडी

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये कृष्णा जन्माष्टमी निमित्त दहिहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यकमामध्ये प्रशालेच्या सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोरख मोरजकर, आशा मोरजकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रशालेच्या चिमुकल्यांनी राधा-कृष्ण ची वेशभूषा परिधान केली होती. तसेच जे विद्यार्थी कृष्णाच्या वेशभूषेत आले होते त्या विद्यार्थ्यांच्या डोळयाला पट्टी बांधून एक आगळी वेगळी दहीहंडी शोधण्यात आली.यावेळी सर्व चिमुकल्या गोविंद गोपाळ यांनी गोविंद आला रे आला गाण्यावर नृत्य करुन दहीहंडी उत्साहात साजरी केली . तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका मोरे यांनी केले व प्रास्ताविक श्रीराम केसकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...