आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी कार्यक्रमाचे उदघाटन:परंडा येथे संत मीरा पब्लिक स्कूलची  दहीहंडी  उत्साहात

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संत मीरा पब्लिक स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाल-गोपाळ विद्यार्थ्यांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य संतोष भांडवलकर, कृषी विद्यालय डोणजेचे प्राचार्य अशोक राठोड, सावित्रीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रसाद अंधारे व पालकांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

इ नर्सरी ते दुसरी पर्यंतचे सर्व मुले श्रीकृष्णच्या वेशात तर मुली राधाच्या वेशात आले होते.सांस्कृतिक विभागाच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्य सादर करून दहीहंडीचा उत्साह द्विगुणित केला.याप्रसंगी दहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून ‘गोविंदा रे गोपाळा ‘च्या घोषणा देत दहीहंडी फोडली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गोपाळकाला वाटण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष शेरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, सुहास आगरकर, अनुराधा गव्हाळे, रोहिणी कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...