आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओला दुष्काळ जाहीर करा:पिकांचे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन

तुळजापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे व पेरणीसाठीचा खर्च पाण्यात गेला.त्यामुळे तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. तसेच हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

यासंबंधी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करत दिलासा द्या. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...