आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीने पेरणी वाया:अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पंचनामे करा ;ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे निवेदन

उमरगा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे. त्यामुळे पाहणी करून तत्काळ मदत देण्याची मागणी अॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी गुरुवारी (दि.४) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही मागील दोन वर्षात विमा कंपन्यांनी विमा न देत अन्याय केला आहे. यंदा तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पेरणी वाया गेली. शेतांमध्ये पाणी साचले आहे. पिके पाण्यात सडली किंवा वाहून गेली.

शिवारात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. निवेदनावर फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, करीमभाई शेख, ॲड. ख्वाजा शेख, किशोर औरादे, धानय्या स्वामी, राजू बटगीरे, प्रदीप चौधरी, बबिता मदने, दादासाहेब माने, ॲड. आर. पी. गणगे, संतोष चव्हाण, अशोक सुरवसे यांच्यासह नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...