आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन:गोगलगाईंमुळे पिकांचे नुकसान, पंचनामे करा

उमरगा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अतिवृष्टी व गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शिवसेना व युवासेनेने केली. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.५) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, यंदा अतिवृष्टी व किडींमुळे नुकसानीचे पंचनामे करत शेतकऱ्यांना मदत जाहीर करा. पंचनामे करण्यास अडचणी येत असल्यास युवासेना, शिवसैनिक प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास तयार आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील, शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, युवासेना शहर प्रमुख अमर शिंदे, जाहिद मुल्ला, दत्ता डोंगरे, आप्पाराव गायकवाड, श्रीकांत पतंगे, उमरगा- लोहारा विधानसभा संघटक शरद पवार, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, संतोष सगर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...