आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकंभरी नवरात्रोत्सव:शाकंभरी नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या महिषासुरमर्दिनी रूपाचे दर्शन

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला गुरुवारी तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा मांडण्यात आली. तत्पूर्वी सकाळी होमकुंडात अग्निस्थापना करण्यात आली. उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता नवरात्राची होमकुंडातील पूर्णाहुतीने सांगता होणार आहे.

सकाळी मानाच्या सिंहासन पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारतीनंतर तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा मांडण्यात आली. या वेळी महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, यजमान श्रीराम कुलकर्णी सपत्नीक यांच्यासह सेवेकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारती करण्यात आली. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १० च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला. संबळाच्या कडकडाटात प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा काढण्यात आली.

आज दुपारी पूर्णाहुतीने नवरात्राची सांगता शाकंभरी नवरात्रोत्सवाची ६ जानेवारीला शाकंभरी पौर्णिमादिनी दुपारी १२ वाजता यजमान श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते होमकुंडात पूर्णाहुतीने सांगता होईल, पूर्णाहुतीनंतर घटोत्थापन करण्यात येऊन नवरात्रातील उपवासाची सांगता होईल. सायंकाळी मातेचा छबिना काढण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...