आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमा:तुळजाभवानी मंदिरात दत्त जयंती साजरी ; दर्शनासाठी दत्त मंदिरात दिवसभर गर्दी

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात बुधवारी दत्त जयंती साजरी करण्यात आली. दुपारी १२ वाजता श्री दत्त मूर्तीची पुजा, आरती करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाविकांनी दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी दत्त मंदिरात दिवसभर गर्दी केली होती. तुळजाभवानी मंदिरात आयोजित दत्त जयंती सोहळ्याला तुळजाभवानी मातेचे महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, काटकर, बब्रुवान पलंगे यांच्यासह पुजारी, भाविकांची उपस्थिती होती. दत्त जयंती पौर्णिमेचा योग साधत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दत्त जयंती निमित्त शहरातील पंचायत समिती आवारात असलेल्या श्री दत्त मंदिरात पारंपारिक पद्धतीने साजरी केली. बस स्थानकाच्या शेजारील दत्त मंदिरातही अॅटो रिक्षा संघटनेच्या वतीने दत्त जयंती साजरी केली. यावेळी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...